Skin Care – चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त 2 रुपये पुरेसे आहेत, वाचा
आपण चेहरा सुंदर दिसावा याकरता अनेक रासायनिक उत्पादने चेहऱ्यावर लावतो. परंतु चेहरा सुंदर दिसण्यासाठी केवळ 2 रुपये पुरेसे आहेत असं कोणी तुम्हाला सांगितलं तर पटेल का? तर या प्रश्नाचं उत्तर हो असे आहे. रोज 2 रुपयांचा एक टोमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी पुरेसा आहे. चेहरा सुंदर दिसण्यासाठी टोमॅटोचा वापर हा खूप गरजेचा आहे.
टोमॅटो तुमचा पार्लरचा खर्च निम्म्याने कमी करू शकतो आणि तुमच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक आणु शकतो. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकतो आणि टॅनिंग, मुरुमे यासारख्या अनेक त्वचेच्या समस्या दूर करतो.
Health Tips – अशक्तपणावर मात करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खाणे गरजेचे, वाचा
भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारची सॅलड करण्यासाठी टोमॅटो हा आपल्या किचनमध्ये असतोच. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टॅनिंग, मुरुमे यासारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे फायदे
शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे कोरडी त्वचा आणि एक्जिमा होऊ शकतो. टोमॅटो नैसर्गिक उपचारक म्हणून काम करतो आणि त्वचेला ओलावा देण्यास मदत करतो आणि कोरडेपणापासून वाचवतो. हा उपाय करण्यासाठी, 1 चमचा टोमॅटोच्या रसात समान प्रमाणात मध मिसळा. हलक्या हाताने हे द्रावण चेहऱ्यावर लावा. हा उपाय केल्याने त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक देखील टिकून राहते.
Weight Loss Fruit – वजन कमी करण्यासाठी हे एक फळ आहारात न विसरता समाविष्ट करा
त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोचा वापर देखील केला जाऊ शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात एंजाइम असतात. त्वचेवर एक्सफोलिएटर म्हणून काम करतात त्यामुळे मृत त्वचा निघण्यास मदत होते. टोमॅटोची पेस्ट थेट चेहऱ्यावर लावावी आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवावा.
टोमॅटोमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असल्याने, चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या इत्यादी कमी करण्यास मदत करू शकते. हा उपाय करण्यासाठी, टोमॅटोचा रस फेस पॅक म्हणून वापरा.
टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए त्वचेला ताजेतवाने तसेच उजळपणा देण्यास मदत करतात. नियमित वापराने चेहऱ्यावरील काळे डाग देखील दूर होतात. टोमॅटोच्या रसात ताक मिसळून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावावे लागेल. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List