Ratnagiri News – मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंग रूम जमीनदोस्त, पर्यटकांची गैरसोय
दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णतः जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथे भटकंती करिता आलेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनारा हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर नेहमीच वर्दळ असते. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी महिला व पुरुष अशा स्वतंत्र दोन चेंजिग रूम येथे बांधलेल्या होत्या. त्यात शौचालये आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली होती. अशा प्रकारच्या सोयी असलेल्या मुरुड येथील दोन्ही चेंजिंग रुम या जमीनदोस्त झाल्या आहेत त्यामुळे येथे भटकंती करिता आलेल्या पर्यटकांची सोयी अभावी मोठीच गैरसोय होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List