Pune Crime – इन्स्टाग्रामवरून ओळख, मग अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा दाखल
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून महिलांशी जवळीक साधत गैरफायदा घेत लैंगिक शोषण, मानसिक छळ, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे दोन गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आले आहेत. इन्स्टाग्रामवरून सुरू झालेल्या ‘मैत्री’चं रूपांतर हनी ट्रॅपमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत भारती विद्यापीठ आणि खराडी पोलीस ठाण्यांत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात, एका 37 वर्षीय विवाहित महिलेनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2024 ते 1 जुलै 2025 या कालावधीत इन्स्टाग्रामवरून एक तरुणाशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्री, त्यानंतर वैयक्तिक संवाद वाढत गेला. त्या तरुणाने व्हिडिओ कॉलवर तिला नग्न होण्यासाठी भाग पाडलं. त्यावेळी त्याने स्क्रीनशॉट्स आणि तिचे व्हिडिओ क्लिप्स काढून ठेवल्या. यानंतर संबंधित महिलेवर मानसिक ताण निर्माण करत तिचा मुलगा, भाऊ आणि इतर नातेवाईकांना हे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले, असे तिने पोलिसांना सांगितले.
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली
दरम्यान, वेळोवेळी शरीरसंबंधाची मागणी करत आरोपीने पैसेही उकळण्याचा प्रयत्न केला. पैसे न दिल्यास फोटो अधिक व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्या महिलेचे काही नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले. त्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली आली असून पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर
दुसऱ्या घटनेत एका 19 वर्षीय तरुणीने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली. नंतर एका ठिकाणी बोलावून लग्नाचं आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. या संबंधासाठी तिची संमती नव्हती. मात्र, आरोपीने तिचे काही खासगी फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतरही त्याने अनेक वेळा तिचा लैंगिक छळ केला. या गंभीर प्रकरणात खराडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि धमकी यासह विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून सुरू होणाऱ्या अशा सायबर ट्रॅपमुळे अनेक महिला आणि तरुणी अडचणीत येत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List