ऐकावं ते नवलच! मोठ्या ओठांसाठी खर्च केले 1.3 कोटी रुपये
प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. एका स्पॅनिश महिलेने आपले ओठ मोठे करण्यासाठी त्यावर तब्बल 1.3 कोटी रुपये खर्च केले आहेत. ओठ हे मोमोजसारखे दिसावे यासाठी या महिलेचा अट्टहास होता. विएना वुर्स्टेल असे या महिलेचे नाव असून ती स्पेनच्या मेजॉर्का येथील राहणारी आहे. विएना एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. तिने आतापर्यंत ओठावर 39 लाख आणि एकूण शस्त्रक्रियेवर 1.3 कोटी रुपये खर्च केले आहेत. तिच्या या ओठावरून तिला अनेक जण ट्रोल करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List