पोलिसांच्या सावली इमारतींचा समावेश पुन्हा एकदा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात करावा, आदित्य ठाकरे यांची मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधीमंडळातील नेते आदित्य ठाकरे यांनी आज सभागृहात बोलताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सावली इमारतींचा देखील समावेश होता. मात्र आता या इमारतींचा समावेश या पुर्नविकासातून हटवल्याचे समजते, अशी शक्यता आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच ”निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःची सोसायटी बनवण्याचा अधिकार द्यावा. त्यांना मुंबईतच जागा देऊन इमारती बांधून घरे विकत घेण्याचा अधिकार द्यावा”, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी ते म्हणाले की की ”माझ्या मतदार संघातील शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर संकटाच सावट आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत सावली इमारतीचा समावेश करण्यात आला होता. आता या इमारतीला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून काढले असल्याचे कानावर येत आहे. ठराविक लोक पात्र होते. त्यांना तिथे घर मिळायला हवीत. त्याचा बीडीडीवर फारसा काही मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की सावली इमारतीचा समावेश पुन्हा एकदा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात करावा. पोलीस कॅम्पमध्ये राहणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून दंड शुल्क आकारलं जातो. तसेच त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्यावरील दंड शुल्क कमी करावा. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःची सोसायटी बनवण्याचा अधिकार द्यावा. त्यांना मुंबईतच जागा देऊन इमारती बांधून घरे विकत घेण्याचा अधिकार द्यावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List