करीना कपूर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय असं खास खाते? न्यूट्रिशनिस्ट केला तिच्या फिटनेसचा खुलासा
करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. करिनानेच साईज झिरोला प्रसिद्धी दिली होती आणि आई झाल्यानंतरही करिनाला तिचा फिटनेस राखण्याचा प्रयत्न कराताना दिसते. करिनाला पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात की करीना स्वतःला कसं काय एवढं फिट ठेवते. करीना योगा किंवा व्यायाम देखील करते आणि तिच्या डाएटची देखील काळजी घेते. तिचे योगा आमि व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
एका मुलाखतीत करिनाच्या न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी तिच्या डाएटबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. , करीना नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात काय खाते? हे देखील रुजुता यांनी सांगितले. त्या म्हणाल्या करीना गेल्या 18 वर्षांपासून म्हणजेच 2009 पासून तिचा खास डाएट फॉलो करत आहे.
करीना कपूरचा काय आहे डाएट
सकाळी नाश्त्यापूर्वी – बदाम, अंजीर आणि मनुका यांसारखे सुके फळे
नाश्ता – पराठा किंवा पोहे
दुपारचे जेवण – डाळ आणि भात किंवा चीज टोस्ट
संध्याकाळचा नाश्ता – आंबा किंवा आंबा मिल्कशेक (हंगामी शेक)
रात्रीचे जेवण- तुपासह खिचडी किंवा पुलाव
रुजुताने सांगितले की करीनाला सेटवर डाळ-भात खायला आवडतो आणि ती सहसा दुपारच्या जेवणात रोटी-सब्जी खाते. करीना आठवड्यातून चार वेळा खिचडी आणि तूप खातेच खाते. तिची ती फेव्हरेट डीश आहे.
एकाच प्रकारचे अन्न लागते
करीनाने देखील तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिचा कुक तिच्यावर नाराज असतो कारण करीनासाठी 10 ते 15 दिवस सतत एकाच प्रकारचे अन्न शिजवले जाते. तेच डाळ भात किंवा दही भात. करीनाने म्हटले होते की, “आठवड्यातून 5 दिवस खिचडी खाऊनही मी आनंदी राहू शकते. त्यात चमचाभर तूप घालून खाल्ल्यानंतर मला आनंद मिळतो.”
करीना योगा देखील करते
करीना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते. योगा हा करीनाच्या आयुष्याचा एक भाग आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडते पण योगा तिला सर्वात जास्त आवडतो. करीना 10 वर्षांपासून योगा करत आहे. योगाव्यतिरिक्त, करीना पिलेट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List