Hair Care – केसांना मुलतानी माती लावण्याचे काय होतात फायदे? वाचा
मुलतानी मातीचे असंख्य उपयोग सौंदर्यासाठी होत असल्यामुळे, फार पूर्वीपासूनच मुलतानी माती आपल्या घरामध्ये विराजमान झाली आहे. मुलतानी मातीचा उपयोग केवळ चेहरा सुंदर ठेवण्यासाठी नव्हे तर, केसांचे सौंदर्य जपण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी माती केवळ त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी नाही तर, हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळेच मुलतानी माती हा कमी खर्चिक उपाय अगदी घरबसल्या आरामात करता येतो.
मुलतानी मातीचा मूळ गुणधर्म थंडावा असल्याकारणाने, त्वचेसोबत केसांसाठी सुद्धा ही माती अतिशय उपयुक्त मानली जाते. म्हणूनच घरात मुलतानी मातीचा फेस पॅक आणि केसांसाठी पॅक करणाऱ्यांची संख्या आता दिवसागणिक वाढू लागली आहे.
प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी मुलतानी माती वापरली जात आहे. परंतु मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठी सुद्धा तितकीच उपयुक्त आहे.
- मुलतानी मातीच्या वापरामुळे केसांची मुळे मजबूत होतात, तसेच टाळूवरील रक्ताभिसरण सुधारण्यास सुद्धा मदत होते.
- मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने, कोंड्यापासून आराम मिळतो.
- कोरफडीचा गर आणि मुलतानी माती एकत्र मिसळुन लावल्याने, केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- दही आणि मुलतानी माती केसांवर लावल्याने केस हायड्रेट होतात आणि केसांना आर्द्रता देखील मिळते. कोरड्या केसांसाठी हा हेअर मास्क खूप चांगला आहे.
- मुलतानी माती केसांवर लावल्यास केस सतेज आणि निरोगी दिसण्यास अधिक मदत होते.
- केसातील कोंडा कमी करण्यासाठी मुलतानी माती एक खात्रीचा उपाय मानला जातो.
- केस मऊ मुलायम ठेवण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
- केसांना मूळापासून मजबूत बनविण्याचे काम मुलतानी मातीमुळे साध्य होते.
Hair Care – आता केसगळतीवर हमखास जालीम उपाय, फक्त 15 रुपये होईल खर्च! केसही होतील घनदाट
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List