जुलैमध्येच नाथसागर अर्धा भरला

देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर मराठवाड्यासाठी आनंदवार्ता आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धातच जायकवाडी धरण अर्धे भरले असून, वापरायोग्य पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्या नाथसागर जलाशयात 16 हजार 295 क्युसेस प्रमाणे नवीन पाण्याची आवक होत असून, गेल्या वर्षी आजच्याच तारखेला प्रकल्पात केवळ 4 टक्के जलसाठा शिल्लक होता हे विशेष !

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 20 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 9 धरणांमध्ये पुरेपूर पाणीसाठा झाला आहे. अनेक धरणांनी जलविसर्ग सुरू केलेला आहे. गोदावरी नदीच्या पात्रातूनही पाणी वाहत आहे. या पार्श्वभूमीवर 20 मार्चपासून नाथसागर जलाशयात पाणी येण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे 29 टक्के असलेल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत गेली. बाष्पीभवनाचा वेगही मंदावला असून, पाण्याची आवक कमी अधिक असली तरी जलसाठ्यात 17 दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती दगडी धरण उपविभागीय शाखा अभियंता गणेश खरडकर यांनी दिली. आज 6 रोजी दुपारी 12 वाजता धरणाच्या पाणीपातळी मापक यंत्रावर 1511 फूट पाणीपातळीची नोंद झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 1522 पाणीपातळीची आवश्यकता आहे. धरणात असलेल्या एकूण 1825.923 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी वापरायोग्य पाणीसाठा 1087 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. वापरायोग्य पाणीसाठा 50.11 टक्के असून, सध्या धरणात 16 हजार 295 क्युसेस याप्रमाणे नव्याने जलौघ दाखल होत आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढण्याचे सातत्य कायम राहणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उपविभागीय अभियंत्या श्रद्धा निंबाळकर यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या