रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, 477 ड्रोन, 60 क्षेपणास्त्रे डागली; अमेरिकेचे एफ-16 विमानही पाडले
मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून शनिवारी रात्री रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. रशियाने युक्रेनवर तब्बल 477 सुसाईड ड्रोन्स व 60 क्षेपणास्त्रs डागली तसेच अमेरिकेचे एफ-16 हे विमानही पाडले.
रशियाच्या हल्ल्याला युक्रेनने दुजोरा दिला आहे. युक्रेनी सैन्याने रशियाचे 211 ड्रोन आणि 38 क्षेपणास्त्रs पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे, मात्र इतर ड्रोन व मिसाईलच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. बहुमजली इमारती व महाविद्यालयावरील हल्ल्यात एका लहान मुलासह 6 नागरिक जखमी झाले आहेत.
आता बस्स झाले! – झेलेन्स्की
रशियाच्या या महाभयंकर हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून भावनिक आवाहन केले. ‘हे युद्ध आता थांबले पाहिजे. त्यासाठी हल्लेखोर देशावर दबाव गरजेचा आहे. तसेच आमच्या संरक्षणासाठीही जगाने पुढे यायला हवे. अवघ्या एका आठवडय़ात रशियाने युक्रेनवर 1270 ड्रोन, 114 क्षेपणास्त्रs आणि सुमारे 1100 ग्लाइड बॉम्ब टाकले आहेत, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. त्यांनी अमेरिका व इतर सहकारी देशांना तातडीने पेट्रीयॉट क्षेपणास्त्र यंत्रणा पाठवण्याचे आवाहन केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List