बिहारमध्ये रहदारीच्या वाटेवरून तुंबळ हाणामारी, सहाजण जखमी; व्हिडीओ व्हायरल
बिहारमध्ये रस्त्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. ही हाणामारी इतकी भीषण होती की यात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांत रहदारीच्या वाटेवरून वाद होते. काल दोन्ही गटांत याच वाटेवरून वाद झाला. आधी बाचाबाची झाली आणि बाचाबीचे रुपांतर हाणामारीत झाले. हाताल जे लागेल त्याने लोक एकमेकांना मारत होते. यात दोन्हीकडच्या बाजूने एकूण सहाजण जखमी झाले. जेव्हा ही हाणामारी झाली तेव्हा लोक फक्त बघत होते आणि काही लोक तर व्हिडीओ काढण्यात मश्गूल होते. काही जणांनी आपला जीव वाचावा म्हणून पळ काढला.
ही हाणामारी सुरूच होती तेव्हा पोलिसांना याबाबत कुणीतरी माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही भांडण सोडवली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List