कोणत्या बाटलीतले पाणी सर्वात उत्तम? तांब्याच्या की स्टीलच्या

कोणत्या बाटलीतले पाणी सर्वात उत्तम? तांब्याच्या की स्टीलच्या

घराबाहेर पडताना किंवा कार्यालयात जाताना आपण सोबत पाण्याची बाटली घेतो. परंतु सध्याच्या घडीला अनेकजण आपल्यासोबत तांब्याची बाटली घेताना दिसतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे आपल्या आरोग्यास अनेक फायदे मिळतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते.

पाण्याला आपण जीवन म्हणून संबोधतो, म्ह्णूनच  निरोग़ी  आरोग्यासाठी  संतुलित  आहार, योग्य व्यायाम  याचबरोबर भरपूर  पाणी  पिण्याचा  सल्ला  दिला  जातो. शारिरीक  स्वास्थ्य  सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने  घेतली. तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे उत्तम की स्टीलच्या बाटलीतील पाणी सर्वात उत्तम हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स

मुख्य म्हणजे स्टीलच्या भांड्यातील पाण्याचा कोणताच फायदा शरीराला होत नाही. त्यामुळेच स्टीलच्या बाटलीतून पाणी पिणे हे शरीरासाठी अजिबात लाभदायक नसते.

 

तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरातील त्रिदोष नाहीसे होतात. म्हणूनच किमान 8  तास तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी नियमित प्यावे असे म्हटले जाते.

 

तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात.

तांब्याच्या बाटलीतील पाणी हे आपल्या कफाच्या समस्येवर फार गुणकारी मानले जाते.

 

पित्त, अल्सर किंवा पोटात  ग़ॅसचा  विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या  भांडात ठेवलेले  पाणी पिणे अत्यंत हितकारी  आहे.

 

तांब्याच्या बाटलीतील  जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश  होतो, जळजळ होण्याची  समस्या  कमी  होते.

 

तांब्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ  होतो. परिणामी  पोट  स्वच्छ  राहण्यास मदत  होते.

 

तांब्याच्या बाटलीतील पाणी पचनसंस्थेला चालना देते. तसेच हे पाणी वजन कमी करण्यासही खूप उपयोगी मानले जाते.

तांब्याच्या बाटलीतील पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत  होते.

तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती