Ratnagiri News – शिवसेना मनसेच्या दणक्याने महाराष्ट्र सरकारची जुलमी हिंदी भाषा सक्ती रद्द; मंडणगडमध्ये जल्लोष

Ratnagiri News – शिवसेना मनसेच्या दणक्याने महाराष्ट्र सरकारची जुलमी हिंदी भाषा सक्ती रद्द; मंडणगडमध्ये जल्लोष

मराठी भाषिक महाराष्ट्रात राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची जुलमी भाषा सक्ती लादली होती. याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या जुलमी निर्णयाविरोधात एल्गार पुकारला होता. शिवसेना मनसेने पुकारलेल्या या एकत्रित एल्गाराचा महाराष्ट्र सरकारने धसका घेतला आणि विद्यार्थ्यांवर लादलेली भाषा सक्ती मागे घेतली. त्यामुळे शिवसेना मनसेने मंडणगड तालुक्यात सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत, फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा केला.

मंडणगड शिवसेना तालुका संघटक जितेंद्र दवंडे तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष नवज्योत गौड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडणगड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मंडणगड शहरातील नूतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीतून मुक्त झाल्याच्या निमित्ताने मिठाई वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात यापुढे ठाकरे ब्रँडच चालणार असल्याची ही नांदी असल्याने यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. लवकरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी अस्मिता जागृत करतील अशी आशा देखील व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिवसेना मंडणगड तालुका संघटक जितेंद्र दवंडे, उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टुरे, मंगेश दळवी, युवासेना तालुका अधिकारी विश्वनाथ टक्के, जेष्ठ शिवसैनिक मारुती कुळे, युवासेना उपतालुका अधिकारी उमेश घागरूम, विभाग प्रमुख आत्माराम म्हापदी, उपविभाग प्रमुख कलंदर मुंगरूसकर, मंडणगड शहरप्रमुख दशरथ सापटे, युवासेना शहर अधिकारी समीर कदम, समीर मुल्ला, शिवसेना महिला शहर संघटिका लक्ष्मी भुईया राणे, जेष्ठ शिवसैनिक मोहन दळवी, माजी सरपंच दिपक बोर्ले, प्रसाद यादव, विजय पंदीरकर, सुभाष पालशेतकर, अभय पिचुर्ले, उदय जाधव, किशोर महाडिक, वसंत अबगूल तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष नवज्योत गौड, उपतालुकाध्यक्ष मुस्तकिम कारविनकर आदींसह शिवसैनिक तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱया व्हीआयपी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार...
मराठी शिकायचे आहे – सुनील शेट्टी
इंग्लंडचं ठरलं! हिंदुस्थानचं कधी ठरणार? हिंदुस्थानचे अंतिम अकरा अद्यापही गुलदस्त्यात
‘कॅप्टन कूल’ होणार धोनीचा ब्रॅण्ड, ट्रेडमार्क नोंदणीसाठी केलेला अर्ज स्वीकृत
यशस्वी ‘मुंबईकर’ झाला, एमसीएने नाहरकरत प्रमाणपत्र मागे घेतले
जग्गूदादाला हवीय वाळकेश्वरच्या चाळीतील ‘ती’ खोली
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस