सत्ताधाऱ्यांनी फोटोशूटसाठी छत्रपतींनाच झाकले, फोटो शेअर करत अंबादास दानवेंनी साधला निशाणा

सत्ताधाऱ्यांनी फोटोशूटसाठी छत्रपतींनाच झाकले, फोटो शेअर करत अंबादास दानवेंनी साधला निशाणा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाआधी सत्ताधारी व विरोधकांनी विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोत महायुतीच्या आमदारांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांनाच झाकले. या फोटोत महायुतीच्या आमदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तो फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी सत्ताधारी व विरोधक असा दोघांचाही छत्रपतींच्या पुतळ्याजवळचा फोटो शेअर करून महायुतीला फटकारले आहे.

”हे सत्ताधारी आणि विरोधकांचे दोन वेगवेगळे फोटो बघा. हिंदी सक्तीसारखे हुकूमशाही निर्णय लादू पाहणारे आज छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण झाकून नारेबाजीचे थोतांड करताना दिसले. ज्या राजांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांना दिसु तरी का द्यायचे ना. भाऊ-भाई-दादा दिसले, बस्स झालं”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली
सातारा जिह्यातील ग्रामपंचायतीसुद्धा हायटेक होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांची कसुली अधिक सुलभ क पारदर्शक करण्यासाठी...
दोनदा पेरण्या करूनही हजारोंची बियाणे वाया, यंदा पावसाने शेतकऱयांच्या डोळ्यांत आणले ‘पाणी’
नाले बंदिस्त करून महापूर कसा येणार आटोक्यात? जागतिक बँकेचा 611 कोटींच्या प्रकल्पावर प्रश्न
सकाळी पोट साफ होण्यासाठी, रात्री झोपण्याआधी फक्त 1 रुपयांचा हा पदार्थ खा!
कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी
माझी मातृभाषा अस्सल मराठी, भाषावाद हा जाणून बुजून निर्माण केलेला वादंग! अमोल पालेकर
जेव्हा दिल्लीने अघोरी सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिलाय – संजय राऊत