पंढरपुरात दिडशे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर; भाविकांना होणार सुलभ दर्शन

पंढरपुरात दिडशे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर; भाविकांना होणार सुलभ दर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील घुसखोरी, तात्काळ आरोग्य व्यवस्था, अनुचित प्रकार घडू नये व इतर घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याशिवाय, नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी मदत होत आहे. याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेर्‍यांचा अक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण वेळ ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून, त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांचेकडे आहे. वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज होती. त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

डेटा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था
आयपी, अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेराद्वारे चित्रित केलेला डेटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. संबधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्याने कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे. आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करता येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;