Sindhudurg News – अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sindhudurg News – अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी, खरीप हंगामातील भात  पिक नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, फळपिक विम्याचे टिगर जाहीर करावेत, खतांचा पुरवठा सुरळीत करावा, त्याचबरोबर अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अकरावीचे वर्ग सुरु करण्याची कार्यवाही करावी अशा मागण्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन केल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून सबंधित मागण्यांवर  अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.

शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची देखील भेट घेऊन साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली. राज्य शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली मात्र ग्रामीण भागात प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच करावी. त्याचबरोबर नवीन अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला केवळ 10 टक्के इन हाऊस कोट्याची घातलेली अट रद्द करावी. ओबीसी ,व्हीजे, एनटी,एसबीसी ,एसईबीसी , इडब्ल्यूएस या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर अनिवार्य केल्याची अट रद्द करावी आणि अकरावीचे शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर सुरू करावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असे म्हटले आहे.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,डिगस सरपंच सौ. पवार,मंदार खोटावळे,श्री सावंत उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱया व्हीआयपी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार...
मराठी शिकायचे आहे – सुनील शेट्टी
इंग्लंडचं ठरलं! हिंदुस्थानचं कधी ठरणार? हिंदुस्थानचे अंतिम अकरा अद्यापही गुलदस्त्यात
‘कॅप्टन कूल’ होणार धोनीचा ब्रॅण्ड, ट्रेडमार्क नोंदणीसाठी केलेला अर्ज स्वीकृत
यशस्वी ‘मुंबईकर’ झाला, एमसीएने नाहरकरत प्रमाणपत्र मागे घेतले
जग्गूदादाला हवीय वाळकेश्वरच्या चाळीतील ‘ती’ खोली
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस