Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचा शोध सुरू, पोलिसांकडून वसतिगृहात चौकशी

Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचा शोध सुरू, पोलिसांकडून वसतिगृहात चौकशी

रत्नदुर्ग किल्ल्यावरून एक तरूणी खाली पडल्याची घटना रविवारी घडली होती. अद्यापही त्या तरूणीचा शोध लागलेला नाही. रत्नागिरीतील काही वसतिगृहात जाऊन पोलिसांनी शोध घेतला. मात्र अजून त्या तरुणीची माहिती मिळालेली नाही.

रविवारी दुपारी 12 वाजता एक तरुणी रत्नदुर्ग किल्ल्यावरील रेलिंगच्या पलीकडे जाऊन बसली होती. त्या किल्ल्यावरून ती खाली समुद्रात पडली. त्या तरूणीचे जॅकेट, ओढणी आणि चप्पला रेलिंगजवळ सापडल्या होत्या. समुद्र खवळलेला असल्याने शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला. त्या तरूणीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले होते. आजही पोलीस शोध घेत होते. महिला पोलिसांनी आसपासच्या वसतिगृहात जाऊन शोध घेतला मात्र अद्याप त्या तरुणीची माहिती मिळाली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;