मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यात अडकलं बोईंग विमान; धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजुला कलंडलं अन्…

मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यात अडकलं बोईंग विमान; धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजुला कलंडलं अन्…

एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला. लंडनला निघालेल्या या बोईंग विमानाने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही सेकंदात हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील प्रवाशांसह 270 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आताही अशाच एका बोईंग विमानाच्या अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे.

इंडोनेशियातील टांगरेंग शहरातील विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोईंग विमान धावपट्टीवर उतरत असताना मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. या खराब हवामानाचा तडाखा विमानाला बसला आणि धावपट्टीवर स्पर्श होताच विमान एका बाजुला कलंडले. दैव बलवत्तर म्हणून आणि पायलटने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

माध्यमातील वृत्तानुसार, बतिक एअर कंपनीचे बोईंग 737 हे विमान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात अडकले. हे विमान शनिवारी इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानताळवर उतरत असताना हवामान खराब झाले आणि थोडक्यात अपघात टळला. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, विमान उतरत असताना मुसळधार पाऊस सुरू असून दृश्यमानता कमी झालेली आहे. याचाच फटका विमानाला बसला आणि विमानाची मागची चाके धावपट्टीवर स्पर्श होत असताना विमान एका बाजुला कलंडते. विमानाचे पंखे जमिनीवर घासली जातात. यामुळे प्रवाशांचाही थरकाप उडतो. अखेर पायलट प्रसंगावधान दाखवतो आणि विमान धावपट्टीवर सुखरूप उतवरतो.

एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, एअर होस्टेसचा विनयभंग; सीआयएसएफने केली अटक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती