मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे; अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केला मराठीबाबत आदर

मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे; अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केला मराठीबाबत आदर

राज्यात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, या सक्तीविरोधात राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वादाबाबत अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया देत मराठीबाबतचा आदर व्यक्त केला आहे. मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.

मी कर्नाटकचा आहे म्हणून मला मराठी येत नाही. मात्र, मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला तर चाहत्यांना ते आवडते. मला मराठी नाही आली तर दुसऱ्यांना नाहीतर मला त्रास झाला पाहिजे. मला मराठी येत नसल्याची लाज वाटिली पाहिजे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायचे आहे, असेही त्याने म्हटले आहे. यातून सुनील शेट्टीने मराठी भाषेबद्दल असलेला आदर दाखवून दिला आहे. त्याच्या या वक्तव्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी इथे काम करतो, इथं मी वाढलोय. त्यामुळं मला मराठी येणं गरजेचं आहे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायची आहे, असेही तो म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;