तेलंगणात गोळ्या-औषधं बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; 8 मजुरांचा होरपळून मृत्यू, 26 गंभीर जखमी

तेलंगणात गोळ्या-औषधं बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; 8 मजुरांचा होरपळून मृत्यू, 26 गंभीर जखमी

तेलंगणामध्ये संगारेड्डी जिल्ह्यातील गोळ्या-औषधे बनवणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. सोमवारी सकाळी कारखान्यातील रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन 10 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर 26 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमिराम भागात असलेल्या सिंगाची इंटस्ट्रीज नावाच्या कारखान्यातील रिएक्टरचा स्फोट झाला. सोमवारी सकाळी 9.30 वाजता हा भीषण स्फोट झाला. अपघात झाला तेव्हा कारखान्यामध्ये 100 हून अधिक मजूर काम करत होते. यापैकी अनेक कामगार होरपळले असून 8 जणांचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, डीआरएफ, एसडीआरएफच्या पथकासह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. स्फोटात अनेक कामगार होरपळले असून ढिगाऱ्याखालीही काही कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2 लाखांची मदत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात झालेली दुर्घटना दु:खद आहे. जवळचा व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांप्रती संवेदना आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तसेच पीएमएलआरएफमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात येत आहे, असे ट्विट मोदींनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;