आमचे संबंध उत्तम, मतभेद असल्याच्या फक्त अफवा; डीके शिवकुमार यांच्याशी संबंधांबाबत सिद्धरामय्यांनी स्पष्ट केली भूमिका

आमचे संबंध उत्तम, मतभेद असल्याच्या फक्त अफवा; डीके शिवकुमार यांच्याशी संबंधांबाबत सिद्धरामय्यांनी स्पष्ट केली भूमिका

कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगत आहेत. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीके शिवकुमार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया देत आमच्यात मतभेद असल्याच्या फक्त अफवा आहेत, आमचे संबंध उत्तम आहेत, असे स्पष्ट केले आहे. सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमचे संबंध चांगले आहेत, कोणीही काहीही बोलो.आमच्यातील बंध मजबूत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशी मतभेदाच्या अफवा फेटाळून लावल्या. या अफवा फेटाळून लावत सिद्धरामय्या म्हणाले की, सर्व अटकळ असूनही, शिवकुमार यांच्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. यादरम्यान एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, डीके शिवकुमार हसताना दिसत आहेत, तर सिद्धरामय्या त्यांचा हात धरून हवेत उचलत आहेत. मतभेदांच्या वृत्तांदरम्यान, दोन्ही प्रमुख नेत्यांमधील हा हावभाव सौहार्द म्हणून पाहिला जात आहे. त्यामुळे मतभेदाच्या चर्चा म्हणजे फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस हायकमांड या वर्षाच्या अखेरीस राज्यातील नेतृत्व बदल करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असताना या नेत्यांमधील संबंधांची चर्चा होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदलावर सांगितले की पक्ष हायकमांड यावर निर्णय घेईल. जेव्हा जेव्हा बदल होईल तेव्हा हायकमांड ते करेल. आता हायकमांड काय निर्णय घेईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;