फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक; म्हणाले की…

फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक; म्हणाले की…

नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले. सरन्यायाधीशांनी फडणवीसांसमोरच उद्धव ठाकरेंचे कौतुक केल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सरन्यायाधीश भूषण गवई अनेक मुद्द्यांवर परखडपणे मते व्यक्त करत असतात. आता त्यांनी फडणवीसांसमोरच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामांचे भरभरून कौतुक केले आहे.

नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी एकदा, दोनदा नव्हे तर किमान तीन-चारवेळा उद्धव ठाकरे यांचे नाव घेत कौतुक केले. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या निर्मितीची गोष्ट सांगितली. या विधी विद्यापीठाचे 2016 साली भूमिपूजन झाले तेव्हा देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळात विद्यापीठाला निधी दिला गेला. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता. त्यावेळी देश आणि जग कोरोना महामारीचा सामना करत होते. कोरोना काळातही उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधीची कमतरता पडू दिली नाही, अशा शब्दात गवई यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

भाजपने विश्वासघात केल्याने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जगावर कोरोनाचे संकट ओढवले. या काळातही उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधी कमी पडू दिला नाही. हे त्यांचे कोरोना काळीतील उत्तम नियोजन होते. विधी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, दुसऱ्या वेळी ते विरोधी पक्ष नेता होते, त्यानंतर तिसऱ्या वेळी ते उपमुख्यमंत्री म्हणून विद्यापीठ कार्यक्रमात उपस्थित राहिले, आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमात उपस्थित आहेत, असे गंमतीशीर भाष्यही गवई यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;