Satara News फडतरवाडीत बिबट्याची पुन्हा एंट्री, जेरबंद करण्यासाठी वनविभाग लावणार पिंजरा
कोरेगाव येथील फडतरवाडी येथे पवारांची पड नावाच्या शिवारात असलेल्या कृष्णा जाधव यांच्या वस्तीवर 12 दिवसानंतर पुन्हा एकदा बिबटया आला. वनविभाग आता जागृत झाला असून या ठिकाणी आजच बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे कोरेगाव वनक्षेत्रपाल जगदाळे यांनी सांगितलं आहे.
एका महिन्यात सलग दोन वेळा बिबट्याने हल्ला करून जाधव यांच्या वस्तीवरील दोन कुत्री आणि एका वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. दोन वेळा झालेल्या घटनेनंतर जाधव यांनी आपल्या वस्तीवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता त्यामुळे तिसऱ्या वेळी मात्र या कॅमेरात त्यांनी बिबट्याला कैद केलं होत त्यानंतर आज चौथ्या वेळेस हा बिबट्या या ठिकाणी आल्याने या बिबट्याला वनविभाग कधी कैद करणार असा प्रश्न भयभीत कृष्णा जाधव यांच्या सह फडतरवाडी गावातील लोकांना पडला आहे.
12 दिवसापूर्वी बिबट्या या वस्तीवर आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने केवळ बिबट्याचे ठसे तपासण्यापेक्षा दुसर काहीच काम केलं नाही त्यामुळे बिबट्याची भीती या कुटुंबासह संपूर्ण गावाला होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी दुपारी याच परिसरात दोन बिबटे पाहिल्याचे कृष्णा जाधव यांच्या भावाने सांगितले. त्यामुळे या ठिकाणी आता नक्की किती बिबटे आहेत याचा शोध वनविभागाला घ्यावा लागणार आहे.
सोमवारी पहाटे पुन्हा या ठिकाणी पिंजऱ्यात ठेवलेली कुत्री ओरडू लागल्याने जाधव घराबाहेर आल्यावर बिबट्या येथून फरार झाला. सलग चार वेळा आपल्या वस्तीवर बिबट्या आल्याने आता या कुटुंबाला स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यापूर्वी वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List