मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, एकूण पाणीसाठा 40 टक्क्यांच्या वर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, एकूण पाणीसाठा 40 टक्क्यांच्या वर

गेला महिनाभर मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलावाचा पाणीसाठी वाढला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतले तलाव 40 टक्के भरले आहेत. मुंबई लागणाऱ्या पाण्याची एकूण क्षमता ही 14.47 लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यापैकी त्यापैकी 5,82,175 दशलक्ष लिटर पाणी मुंबईच्या तलांवात साठले आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या काही तलावातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईला सर्वाधिक पाणी भातसा तलावातून येतं या तलावात सध्या 2,44,439 दशलक्ष लिटर पाणी साठले आहे. भातसा तलावात सध्या 34.08 टक्के भरलेला आहे.

ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि मध्य वैतरणा तलावांमध्येही समाधानकारक वाढ झाली आहे. तानसा तलावात 61,707 दशलक्ष लिटर साठा असून, हा तलाव हे 42.53 टक्के भरला आहे. तसेच मध्य वैतरणा तलाव 43.28 टक्के भरला आहे. अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या चार तलावांतील एकूण पाण्याचा साठा आता 3,22,906 दशलक्ष लिटर झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती