Skin Care – चेहरा सुंदर दिसण्यासाठी कच्चे दूध वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

Skin Care – चेहरा सुंदर दिसण्यासाठी कच्चे दूध वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

सुंदर चेहरा हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. यामध्ये केवळ स्त्रियाच नाहीत तर, पुरुषही सुंदर चेहऱ्याचं स्वप्नं बाळगतात. आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेकविध प्रयोग करतो. हे प्रयोग करताना आपण रासायनिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. त्यामुळेच चेहरा सुंदर होण्याऐवजी निस्तेज होतो. म्हणूनच काही घरगुती उपायांनी चेहरा हमखास सुंदर करता येतो.

त्वचेच्या उत्तम काळजीसाठी कच्चे दूध सर्वोत्तम मानले जाते. कच्चे दूध लावण्यासाठी, काहीच कष्ट लागत नाहीत. हे त्वचेसाठी सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने काळे डागही कमी होतात. दुधात जीवनसत्त्वे, बायोटिन, लैक्टिक ऍसिड, मॅग्नेशियम, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे दूध फक्त पिण्यासाठीच नाही तर, त्वचेसाठी सुद्धा उत्तम मानले जाते. तजेलदार त्वचा हवी असल्यास कच्चे दूध हा एकमेव उत्तम पर्याय मानला जातो.

Skin Care- सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचे फायदे 

दुधामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल तसेच चमक येईल, पण लक्षात ठेवा की तुम्हाला रोज कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करावा लागेल.

कच्चं दूध त्वचेला हायड्रेट करण्यासाठीही फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा फ्रेशही होते. याशिवाय त्वचा नेहमी तजेलदार राहते.

 

मृत त्वचा घालवण्यासाठी आणि चमकदार चेहरा तुम्हाला हवा असल्यास, तुम्ही एकदा कच्चे दूध चेहऱ्याला लावून बघा.

 

दुधामध्ये असलेले जीवनसत्त्व अ आणि ब हे वृद्धत्वविरोधी घटक म्हणून काम करतात. दुधाचा मसाज केल्यास चेहऱ्यावरील अकाली सुरकुत्या निघून जातात.

त्वचा तेलकट असेल तर, कच्चे दूध हा एक चांगला पर्याय आहे. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम, फोड्या येतात. त्यामुळेच तेलकट त्वचेसाठी कच्चे दूध हा चांगला पर्याय आहे.

चेहऱ्यावर काळे डाग, चट्टे असतात. या डागांवर रोज कच्च्या दुधाने मालिश केल्यास हे डाग विरळ होण्यास मदत होते.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती