एलॉन मस्क हुशार आहेत, पण सध्या नाराज आहेत!
बिग ब्युटिफुल’ बिलाच्या मुद्दय़ावरून प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेतील ट्रम्प सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मस्क यांच्या या टीकेला उत्तर देताना ट्रम्प यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ‘मस्क हे स्मार्ट आहेत, पण सध्या ते एका विधेयकामुळे नाराज आहेत. पण त्यांची ही नाराजी चुकीची आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कर कपात, सरकारी खर्च आणि सीमेवरील भिंत अशा विविध तरतुदी असलेल्या विधेयकाच्या सुधारित मसुद्यावरून सध्या ट्रम्प सरकार टीकेच्या रडारवर आहे. मस्क यांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. हे विधेयक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करणारे ठरेल, असे मस्क यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांवरील करकपातीचा निर्णय मागे घेतला जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती, पण माझी भूमिका वेगळी आहे. अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीकडे इलेक्ट्रिक कार असावी असे मला वाटत नाही आणि नेमके तेच मस्क यांना खटकत आहे. असे ट्रम्प म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List