Sindhudurg News – घरासमोर फेरफटका मारताना अचानक महिला बेपत्ता, दुसऱ्या दिवशी खाडीत मृतावस्थेत आढळली

Sindhudurg News – घरासमोर फेरफटका मारताना अचानक महिला बेपत्ता, दुसऱ्या दिवशी खाडीत मृतावस्थेत आढळली

देवगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर फेरफटका मारता मारता एक अपंग महिला अचानक बेपत्ता झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खाडीच्या पाण्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. रेश्मा चंद्रकांत सावंत असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवगड तालुक्यातील पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा सावंत या रविवारी सकाळी घरासमोर फेरफटका मारत होत्या. काही वेळात त्या बेपत्ता झाल्या. सोमवारी सकाळी मोंड वानिवडे येथील खाडीच्या पाण्यात मयत स्थितीत आढळून आल्या. याप्रकरणी रेश्मा यांचे भाऊ प्रकाश सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवगड पोलिसांनी मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली
सातारा जिह्यातील ग्रामपंचायतीसुद्धा हायटेक होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांची कसुली अधिक सुलभ क पारदर्शक करण्यासाठी...
दोनदा पेरण्या करूनही हजारोंची बियाणे वाया, यंदा पावसाने शेतकऱयांच्या डोळ्यांत आणले ‘पाणी’
नाले बंदिस्त करून महापूर कसा येणार आटोक्यात? जागतिक बँकेचा 611 कोटींच्या प्रकल्पावर प्रश्न
सकाळी पोट साफ होण्यासाठी, रात्री झोपण्याआधी फक्त 1 रुपयांचा हा पदार्थ खा!
कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी
माझी मातृभाषा अस्सल मराठी, भाषावाद हा जाणून बुजून निर्माण केलेला वादंग! अमोल पालेकर
जेव्हा दिल्लीने अघोरी सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिलाय – संजय राऊत