Tarak Mehta Ka Ulta Chashma- गेली 17 वर्षें प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी बबिता मालिकेला करणार गुड बाय?

Tarak Mehta Ka Ulta Chashma- गेली 17 वर्षें प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी बबिता मालिकेला करणार गुड बाय?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण केलेली आहे. प्रेक्षकांची या मालिकेशी जुळलेली नाळ हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. तारक मेहतामधील बबिता म्हणजेच मूनमून दत्ता गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्ये मूनमून दत्ता ही मालिका काही काळासाठी सोडणार असल्याची जोरदार चर्चा आता सुरु झालेली आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, मूनमून दत्ताला ‘बिग बॉस 19’ सीझनसाठी संपर्क साधण्यात आलेला आहे. याही आधी मूनमून दत्ताला बरेचदा स्पर्धक म्हणून यावे असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्येक वेळी मूनमूनने नकार दिला होता. यंदा मात्र मूनमून या शो मध्ये जाण्यासाठी तयार असल्याची माहिती कानावर येत आहे. विशेष म्हणजे मुनमुन दत्ता शोमध्ये येण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मूनमूनच्या फॅन पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

यंदा ‘बिग बॉस 19’ सीझन अधिक उत्कंठा वर्धक असल्याची चर्चा आता समोर येत आहे. टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी देखील शोमध्ये दिसणार आहेत. दरम्यानच्या काळात असे काही वृत्त आले होते की, यावेळी हा शो रद्द करण्यात आला आहे. पण या सर्व बातम्या खोट्या ठरल्या आणि हा शो लवकरच 19 व्या सीझनसह परतत आहे. 19 व्या सीझनसाठी डेझी शाह, शरद मल्होत्रा, शशांक व्यास, खुशी दुबे, राम कपूर, गौतमी कपूर यांनाही शोमध्ये भाग घेण्यासाठी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. पण हे स्टार शोमध्ये येणार आहेत की नाही याची कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;