मिठी नदी घोटाळा प्रकरण; डिनो मोरियाच्या अडचणी वाढणार, पुन्हा एकदा चौकशीसाठी दाखल
गेल्या दोन दिवसांपासून मिठी नदी घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यासाठी अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा चौकशीसाठी डिनो मोरिया आणि त्याचा भावाला बोलवण्यात आलं आहे. हे दोघेही चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी त्याची चौकशी सुरु आहे.
डिनो मोरिया आणि त्याचा भावाला तिसऱ्यांदा चौकशीला बोलावलं
दरम्यान डिनो मोरिया 26 मे 2025 रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. डिनोची तब्बल त्यावेळी देखील 8 तास चौकशी करण्यात आली. मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केलं होतं. त्यानुसार सकाळी 11 वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. सायंकाळी 7:30 च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला.
प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल
आज 28 मे 2025 रोजी डिनोची किती तास चौकशी सुरु असणार आणि त्यानंतर काय निकाल हाती हे पाहणं आता महत्त्वाचं झालं आहे. दरम्यान डिनोने अटकपूर्व जामिनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली आहे. तो त्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. डिनो तसेच आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय अशीही ओळख असल्याने या चौकशीला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही कंत्राटदार आणि काही BMC चे अधिकारी देखील आहे. त्यामुळे आता आज या डिनो आणि त्याच्या भावाची किती तास चौकशी होतेय हे पाहण महत्त्वाचं आहे.
नक्की प्रकरण काय?
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 2005 ते 2021 पर्यंत हा प्रकल्प सुरू होता.यासाठी 1100 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आले.बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याच्या कंत्राट प्रकरणी यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
2017 ते 2021 या वर्षांदरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमधील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया. अभिनेता डिनो मोरिया हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांनी म्हटलं जात आहे. त्यामुळे डिनो मोरियाची देखील आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List