Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल

Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल

ओबीसी चळवळीचा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या रिक्त खात्याचा कारभार भुजबळांच्या खाद्यांवर येईल. सत्तेत आल्यावर भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. आता ही नाराजी दूर होत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे दमानिया यांनी भुजबळाविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकल्याचे दिसून येते.

अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत

छगन भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वीच मंत्री पदाबाबत ठरल्याची माहिती त्यांनी दिली. भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने नाशिकसह येवल्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे आता त्यांच्याविरोधात अंजली दमानिया समोर आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडा सवाल केला आहे.

असा काय नाईलाज?

दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी मोठा धुराळा उडवून दिला.

आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचार्‍या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? असा खोचक सवाल दमानिया यांनी केला. किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची कालच्या घोषणा आठवतात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?, असा खडा सवाल दमानिया यांनी भाजपाला विचारला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;