मुंबई, ठाण्यावर अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, पावसामुळे लोकलचा खोळंबा

मुंबई, ठाण्यावर अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, पावसामुळे लोकलचा खोळंबा

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा मोठा फटका हा मुंबई शहराला बसला आहे. मंगळवारी मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर आज देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकळी पावसाचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल ट्रेनला विलंब झाल्यामुळे ऑफिसला निघालेल्या आणि ऑफिसवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

लोकल सेवेला फटका  

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. याच लाईफलाईनला आता पावसाचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. गेल्या एका तासापासून मुंबईच्या उपनगर आणि शहर भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विलंबाने सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही 5 ते 10  मिनिटांनी उशिरा सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कापडाचा तुकडा आणि झाडच्या फांद्या पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही काही वेळेकरता बंद झाली होती. मात्र झाडाच्या फांद्या हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे.

वादळी  वाऱ्यासह पाऊस 

मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारंबळ उडाली. अनेकजण छत्री न घेता तसेच घराबाहेर पडले होते. त्यामुळे पावसात भिजण्याची वेळ त्यांच्यावर आली. तर दुसरीकडे पावसामुळे लोकलचा देखील खोळंबा झाला. लोकल ट्रेन लेट झाल्यामुळे त्याचा मोठा फटका हा नोकरदार वर्गाला बसल्याचं दिसून आलं.

विरार -वसईमध्ये सोसाट्याचा वारा  

दरम्यान दुसरीकडे मंगळवारी रात्री विरार आणि वसईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, बऱ्याच वेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. ऐन रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला,  बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम! Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी...
महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले
मुंबई आमच्या हक्काची… आवाज मराठीचा
मिंधे आमदाराची जीभ घसरली, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना केली गंभीर चूक
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 जुलै ते शनिवार 12 जुलै 2025
रोखठोक – मराठी एकजुटीचा विजय असो!