ठेकेदारांपुढे महायुती सरकारचे लोटांगण, वादग्रस्त ऍम्ब्युलन्स टेंडर सुमित, एसएसजी, बीव्हीजी कंपनीलाच
मिंधे सरकारने मर्जीतल्या ठेकेदार पंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अॅम्ब्युलन्स खरेदी टेंडर्स काढल्याचा आरोप झाला होता. महायुती सरकारनेही त्या पंपन्यांपुढे लोटांगण घातले. आरोग्य विभागाने सुमित एसएसजी आणि बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड या पंपन्यांसोबतच 10 वर्षांचा करार केला आहे.
या कराराअंतर्गत राज्यभरात नवीन महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) 108 अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांची खरेदी आणि त्या चालवण्यासाठी सध्याच्या बाजारभावानुसार वर्षाला सुमारे 325 कोटी रुपये खर्च येतो. पण या टेंडरनुसार राज्य सरकार सुमारे 725 कोटी रुपये म्हणजेच अतिरिक्त 400 कोटी रुपये खर्च करणार आहे. वार्षिक 8 टक्के वाढीचे गणित केले तर 10 वर्षांत शासनाला यामध्ये तब्बल 6 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
या करारानुसार ठेकेदार पंपन्या राज्यात 1756 अॅम्ब्युलन्स राज्यात तैनात करणार आहेत. नोव्हेंबर 2025 पासून पाच टप्प्यांमध्ये ही अॅम्ब्युलन्स सेवा राज्यभर कार्यान्वित केली जाणार आहे. या अॅम्ब्युलन्समध्ये पारंपरिक अॅम्ब्युलन्सशिवाय अद्ययावत अॅम्ब्युलन्स, नवजात शिशु रुग्णवाहिका, दुर्घटनेप्रसंगी घटनास्थळी पोहोचण्यास बाईक्स तसेच नद्या आणि समुद्रातून रुग्णाची वाहतूक करणाऱया रुग्णवाहिकांचाही समावेश असेल असा दावा केला गेला आहे. महायुती सरकारने अॅम्ब्युलन्स टेंडर घोटाळय़ाच्या आरोपांची कोणतीही चौकशी न करता हा करार केल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List