India Pakistan War – कश्मीरमध्ये लष्कराचे दोन जवान शहीद, मुंबईतील घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण
कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्यात हिंदुस्थानचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यातील एक जवान मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. कश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3 वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आले.
सीमेवरील पाकिस्तानच्या हल्ल्याला हिंदुस्थानच्या लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानच्या लष्कराचे दोन जवान शहीद झाले. त्यात मुंबईत घाटकोपरमध्ये राहणारे आणि मूळच्या आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. तर दुसरे जवान दिनेश शर्मा आहेत. पाकच्या गोळीबारात जखमी झालेल्या शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पूंछ सेक्टरमध्ये ते जखमी झाले होते.
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार
शहीद झालेले मुरली श्रीराम नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहत होते. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली होती. त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला आपल्या गावी राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांचे शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले. स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List