‘सिंदूर’ नव्हे आम्ही जीव गमावला; मधुसूदन राव यांच्या पत्नीने मानले जवानांचे आभार
22 एप्रिल रोजी जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात मधुसूदन राव यांचा मृत्यू झाला होता, परंतु याचा बदला हिंदुस्थानने 7 मे रोजी घेतला. ऑपरेशन सिंदूरच्या नावाबद्दल विचारले असता, ‘‘पंतप्रधान मोदींनी बदला घेण्याची जबाबदारी पार पाडली. यामुळे कुटुंबांना दिलासा मिळाला. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. सिंदूर म्हणजे केवळ पतीच नाही तर आम्ही आमचा जीवच गमावला आहे,’’ अशी भावना आपल्या पतीला गमावलेल्या कामाक्षी प्रसन्ना राव यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबद्दल हिंदुस्थानी सैन्याचे आणि सरकारचे आभार मानते, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
ऑपरेशन सिंदूरच्या नावाबद्दल विचारले असता, ‘‘पंतप्रधान मोदींनी बदला घेण्याची जबाबदारी घेतली. यामुळे कुटुंबांना काही दिलासा मिळाला. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. सिंदूर म्हणजे केवळ पतीच नाही तर आम्ही आमचा जीवच गमावला आहे,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दहशतवादी हल्ल्यात 26 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हिंदुस्थानात कोणाहीसोबत असे घडू नये, असे त्या म्हणाल्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि कश्मीरमध्ये नऊ दहशतवादी ङ्गिकाणांवर लष्करी हल्ले झाले. या लक्ष्यांमध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा तळ यांचा समावेश होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List