रेल कामगार सेना ही कामगारांच्या अन्यायाविरोधात लढणारी संघटना, विनायक राऊत यांचे प्रतिपादन

रेल कामगार सेना ही कामगारांच्या अन्यायाविरोधात लढणारी संघटना, विनायक राऊत यांचे प्रतिपादन

रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रेल कामगार सेना ही नेहमी कामगारांच्या अन्यायाविरोधात लढणारी संघटना आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी यावेळी केले. तसेच सीआरएमएसबरोबर असलेल्या युतीचा पुनरोच्चार करून सीआरएमएस संघटनेस कामगार हिताचे कार्य करावे असे संबोधित केले.

रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माटुंगा मुख्य कारखाना प्रबंधक विवेक आचार्यदेखील उपस्थित होते. रेल कामगार सेना जशी आक्रमक आहे तेवढीच शिस्तबद्ध आहे. माझ्याकडे ज्या समस्या पदाधिकारी आणतात त्या कामगारांचा हिताच्या असतात आणि अशा समस्या सोडविण्यास मला आनंद वाटतो, असे विवेक आचार्य म्हणाले.

यावेळी माजी महापौर स्नेहल आंबेकर, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, युनिट अध्यक्ष शशिकांत काळे, सचिव दिनेश खंडाळे, माजी सह कार्याध्यक्ष अर्जुन जामखिंडीकर, मुंबई डिव्हिजन अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, सचिव तुकाराम कोरडे, सहकार्याध्यक्ष सूर्यकांत आंबेकर, भरत शर्मा, भुसावळ मंडल अध्यक्ष ललित मुथा, सरचिटणीस सोनाक्षी मोरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम राणे, मंगेश जोशी, मिलिंद पाटील, वैभव अत्तरदे, सचिन मयेकर, सुधाकर देवकाते, सचिन गुरखे, संजय चिपकर, दिनेश भुरके, चिंता निखार्गे, शिल्पा म्हात्रे, अनघा तेंडुलकर, नीता ढोबळे, चंद्रकांत जळगांवकर, राजेश कोकाटे, अतुल पेडणेकर आणि नरेंद्र यादव यांनी परिश्रम घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर...
Big Breaking India Pakistan War- पुन्हा एकदा पाकिस्तानचा हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला
India Pakistan War- जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरु
Big Breaking India Pakistan War- पंजाब, पठाणकोट अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट
India Pakistan War दिल्लीतील AIIMS रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
India Pakistan War – हिंदुस्थानवर 300 ते 400 ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, मात्र सैन्याने हे ड्रोन हल्ले परतावले
चीनचा बदला घेण्यासाठी सलमान जाणार लडाखला, सुपरस्टाचे नवे टार्गेट