पाकिस्तानी शेअर बाजार धडाम; 6 हजार अंकांच्या घसरणीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची वेळ
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंजमध्ये गुरुवारी त्सुनामी आली. पाकिस्तानचा प्रमुख शेअर बाजार केएसईचा बेंचमार्क इंडेक्स प्रचंड खाली घसरल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग थांबवावी लागली. दुपारपर्यंत केएसई 100 इंडेक्ससुद्धा पाच टक्क्यांहून खाली म्हणजेच जवळपास 7925 अंक घसरून 102983,21 वर ट्रेड करत आहे. याआधी बुधवारीसुद्धा पाकिस्तानी शेअर बाजारात 6 हजार अंकांची घसरण झाली होती. 23 एप्रिलपासून 7 मेपर्यंत पाकिस्तानी शेअर बाजार 6 हजार अंक खाली घसरला आहे. शेअर बाजारात सलग घसरगुंडी होत असल्याने पाकिस्तानातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 22 एप्रिल रोजी कश्मीरमधील पहलगाम या ङ्गिकाणी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात घसरण होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानी शेअर बाजाराचा केएसई इंडेक्स 16,23 अंक घसरला आहे.
हिंदुस्थानी शेअर बाजारातही घसरण
पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्यातील तणावाचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 411.97 अंकांनी घसरून 80,334.81 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 140 अंकांनी घसरून 24,273 अंकांवर बंद झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List