Operation Sindoor- यात्रियो कृपया ध्यान दे!!! वाढत्या तणावादरम्यान राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील अनेक रेल्वे सेवा ‘ब्लॅकआउट’मुळे झाल्या प्रभावित
हिंदुस्थान पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रेल्वेसेवा प्रभावित झालेली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धावणाऱ्या अनेक गाड्या अंशतः रद्द झालेल्या आहेत. तसेच वेळापत्रक बदलण्याचा निर्णयही आता रेल्वेकडून घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि ब्लॅकआउटसारख्या परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी, प्रवास करत असलेल्या त्यांच्या गाड्यांची स्थिती माहित करुन घेण्याची विनंती केलेली आहे.
रद्द झालेल्या गाड्या (9 मे )
14895 भगत की कोठी–बाडमेर
14896 बारमेर–भगत की कोठी
04880 मुनाबाव–बाडमेर
54881 बारमेर–मुनाबाव
वेळापत्रकात बदल केलेल्या गाड्या
14661 बारमेर-जम्मू तावी (9 मे): नियोजित वेळे 00:20 ऐवजी ०6:00 वाजता प्रस्थान.
74840 बाडमेर-भगत की कोठी (9 मे): 03:30 ऐवजी 06:30 वाजता प्रस्थान.
15013 जैसलमेर-काठगोदाम (9 मे): 02:40 ऐवजी 07:30 वाजता प्रस्थान.
राजस्थानमध्ये अनेक रेल्वे सेवांवर परिणाम
पाकिस्तानसोबतच्या सीमेवर वाढत्या तणावामुळे राजस्थानचे सीमावर्ती जिल्हे जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आणि गंगानगर ‘सतर्क’ आहेत. वाढत्या सीमा तणावादरम्यान, ‘ब्लॅकआउट’मुळे राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील अनेक रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, “ब्लॅकआउट” आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी भगत की कोठी-बाडमेर, बारमेर-भगत की कोठी, मुनाबाव-बाडमेर आणि बारमेर-मुनाबाव रेल्वे सेवा रद्द राहतील. त्याचप्रमाणे, जोधपूर-दादर एक्सप्रेस ट्रेन जोधपूरहून नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने धावत होती. इतर अनेक गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List