कांजूर कारशेडच्या कामाला 25 जूनपर्यंत ब्रेक, काम जैसे थे ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश
कांजूरमार्ग येथील मेट्रो-6 कारशेड च्या कामाला तूर्तास ब्रेक लागला आहे. खासगी विकासक आणि राज्य सरकारमधील जागेचा वाद हायकोर्टात प्रलंबित असल्याने 25 जूनपर्यंत कारशेडचे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले.
कांजूरच्या मिठागराच्या जागेचा वाद कायम असताना 15 हेक्टर जागेवर एमएमआरडीएकडून मेट्रो-6 (श्री स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी ते विक्रोळी) करिता डेपो बांधण्यात येणार आहे. त्याकरिता ही जागा एमएमआरडीएकडे राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली असून उप मिठागर आयुक्त यांनी जागेच्या दाव्याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच ही जागा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका मागे घेत असल्याचे पेंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले. या जागेवर खासगी विकासक महेश गरोडिया यांनीही दावा केल्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आज त्यावर सुनावणी घेण्यात आली तेव्हा गरोडिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद करत प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली तर विकासकाने प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर युक्तिवाद करणार, असे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List