पाकड्यांना भीक मागून युद्ध लढण्याची खुमखुमी; हिंदुस्थानच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा कांगावा करत मित्रराष्ट्रांपुढे कटोरा पसरला

पाकड्यांना भीक मागून युद्ध लढण्याची खुमखुमी; हिंदुस्थानच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा कांगावा करत मित्रराष्ट्रांपुढे कटोरा पसरला

युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केला. सीमेजवळील महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करून डागण्यात आलेले हे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. तसेच हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हवाई दल, नौदल आणि लष्कराने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या. आता हिंदुस्थानच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचा कांगावा करत पाकिस्तानने जगभरात कटोरा पसरला आहे. पाकिस्तानच्या अर्थखात्याने जगभरातील मित्र राष्ट्रांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडत प्रतिहल्ला केला. हिंदुस्थानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी जागतिक बँकेसह जगभरातील मित्र राष्ट्रांना अधिक कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

हे वाचा – एलओसीवर हिंदुस्थानी जवानांचे तांडव; पाकिस्तानी चौक्या केल्या उद्ध्वस्त, अधिकृत व्हिडीओ आला समोर

शत्रूकडून झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. युद्धजन्य स्थिती आणि मार्केटमधील घसरगुंडीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;