पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानासोबत दिग्गज अभिनेत्रीचे प्रेमसंबंध; म्हणाले, मी तिच्यासोबत एंजॉय केलं आणि

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानासोबत दिग्गज अभिनेत्रीचे प्रेमसंबंध; म्हणाले, मी तिच्यासोबत एंजॉय केलं आणि

Love Life: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारतात तणावग्रस्त वातावरण आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर देखील हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण एक काळ असा देखील होता जेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा दोन्ही देशांमध्ये वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. सध्या ज्यांची चर्चा रंगली आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आहेत. एककाळ असा होता जेव्हा दोघे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते.

सांगायचं झालं तर 70 – 80 च्या दशकात रेखा हिंदी सिनेविश्वावर राज्य करत होत्या. याचदरम्यान, रेखा आणि इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एका मुलाखतीत खुद्द इमरान यांनी रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो. मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं…’ असं देखील इमरान खान म्हणाले होते.

रेखा आणि इमरान खान यांच्या नात्यावर आधारित एक आर्टिकल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. हे आर्टिकल 11 जून 1995 मधील आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, इमरान खान आणि रेखा लग्न बंधनात अडकणार आहेत. पण असं काहीही झालं नाही.

रिपोर्टनुसार, इमरान खान आणि रेखा यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या आईची देखील मान्यता होती. रेखा यांच्या आईने दोघांच्या नात्याबद्दल ज्येतिषांसोबत देखील बोलणी केली होती. पण रेखा आणि इमरान यांचं लग्न होऊ शकलं नाही…

दाव्यानुसार, इमरान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवला आणि दोघेही जवळपास एक महिना एकत्र राहिले मुंबईच्या बीचवर अनेकदा दोघांना स्पॉट करण्यात आलं. रेखा आणि इमरान यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

सांगायचं झालं तर, रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रेखा यांचं लग्न एका उद्योजकासोबत झालं पण लग्नाच्या काही महिन्यांनी रेखा यांच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर रेखा यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही. आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम! Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी...
महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले
मुंबई आमच्या हक्काची… आवाज मराठीचा
मिंधे आमदाराची जीभ घसरली, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना केली गंभीर चूक
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 जुलै ते शनिवार 12 जुलै 2025
रोखठोक – मराठी एकजुटीचा विजय असो!