खंड खंड होगा पाकिस्तान; बलूच नेत्यांची UN कडे स्वतंत्र राष्ट्राची मागणी
हिंदुस्थाने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवल्यापासून पाकड्यांची तंतरली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले आहेत. तसेच बलुचिस्तानने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रसिद्ध बलुच लेखक मीर यार बलोच यांनी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वतंत्र्य करण्याचा, आझाद करण्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी हिंदुस्थानी सरकारला नवी दिल्लीत बलुच दूतावास उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही घोषणा केली.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण पार्श्वभूमीवर मीर यार यांनी हे विधान केले आहे. 7 मे रोजी हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी ड्रोन, क्षेपणास्त्राच्या सहाय्याने नागरी आणि लष्करी क्षेत्रांना लक्ष्य करून तणाव आणखी वाढला. मात्र, हिंदुस्थानने त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडून प्रत्युत्तर दिले.
बलुच लेखक मीर यार बलोच यांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळणार असल्याचा दावा केला आहे. दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ येत असल्याने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही हिंदुस्थानला दिल्लीत बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करत आहोत, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
आम्ही बलुचिस्तानच्या लोकशाही स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांची बैठक बोलावण्याचे आवाहन करतो. आम्ही संयुक्त राष्ट्रांना विनंती करतो की त्यांनी बलुचिस्थानवर कब्जा करणाऱ्या पाकिस्थानी सैन्याला बलुचिस्तानचे प्रदेश, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगितले पाहिजे. आणि पाकड्यांनी त्यांची सर्व शस्त्रे आणि मालमत्ता बलुचिस्तानमध्ये सोडण्यास सांगितले आहे. सैन्य, सीमा दल, पोलास, लष्करी गुप्तचर संस्था, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलूची नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल. लवकरच एक अंतरिम सरकार जाहीर केले जाईल. बलुचिस्तानच्या या नव्या स्वातंत्र्य सरकारचा समारंभ लवकरच होणार आहे. आम्ही आमच्या मित्र राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रीय परेड पाहण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करत आहोत, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List