हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणाव शिगेला; मुंबईला सतर्कतेचा इशारा, पोलिसांसाठी नव्या सूचना जारी
हिंदुस्थान पाकिस्तान मधील तणाव वाढत असून सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाढता तणाव लक्षात घेता राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उप महानिरीक्षकांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांच्या कुरापती सुरूच आहेच. पाकिस्ताननं गुरूवारी रात्री जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब राज्यातील विविध भागात ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानाद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीम S-400 नं पाकिस्तानच्या ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमान पाडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकड्यांचे सगळे डाव हिंदुस्थान धुकावत असल्यामुळे दहशतवादी देशातील महत्वाच्या स्थळांना लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.
सध्या हिंदुस्थानातील सर्व राज्यातील पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनाही नवीन सुट्ट्या घेण्यात सक्त मनाई केली आहे. हा निर्णय कायमस्वरुपी नसून परिस्थिती बदलल्यास त्यानुसार बदल केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी ज्या पोलिसांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, त्यांची सुट्टी रद्द करण्यात आलेली नाही. तरीही संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List