Pahalgam Terrorist Attack – मला मुसलमान असल्याची लाज वाटतीये, प्रसिद्ध गायकाने व्यक्त केला संताप

Pahalgam Terrorist Attack – मला मुसलमान असल्याची लाज वाटतीये, प्रसिद्ध गायकाने व्यक्त केला संताप

मंगळवारी (22 एप्रिल 2025) जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सारा देश या हल्ल्यामुळे हादरून गेला आहे. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेद केला जात आहे. प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट याने सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून मला मुसलमान असल्याची लाज वाटतीये असं तो म्हणाला आहे.

सलीम मर्चंटने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, हिंदू नसून मुसलमान असल्यामुळे पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांची हत्या झाली. हे हल्लेखोर मुसलमान आहेत? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम या गोष्टी शिकवत नाही. कुरान-ए-शरीफ मध्ये सूरा अल-बकराच्या 256 व्या आयतमध्ये म्हटलं आहे की, धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती करायची नाही, अस म्हणत सलीमने आपल्या राग व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salim Merchant (@salimmerchant)

मला मुस्लीम असल्याची लाज वाटतीये की, मला हा दिवस बघावा लागतोय. माझ्या निष्पाप हिंदू बांधवांना इतक्या क्रुरपने मारण्यात आलं. कशासाठी तर ते हिंदू आहेत म्हणून. काश्मीरमध्ये राहणारे जे लोक गेल्या तीन वर्षांपासून चांगले जीवन जगत होते, त्यांना पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागणार आहे. माझे दुःख आणि राग कसा व्यक्त करावा हे मला समजत नाही, अस तो म्हणाला आहे.

Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, सात दहशतवाद्यांचा खात्मा सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, सात दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू कश्मीरमधील सांबा सेक्टरमधील सीमा भागातून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. सीमा सुरक्षा दलाने...
Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक?
Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे डागली, 4 लढाऊ विमाने पाडली, 3 वैमानिक ताब्यात
Operation Sindoor- हिंदुस्थानी सैन्याची कमाल, सीमेवर घमासान! 45 मिनिटे आकाशात ‘सूदर्शन’चा थरार; नंतर पाकिस्तानात तांडव
Operation Sindoor- पाकिस्तानने अमृतसरवर केलेला हल्ला, हिंदुस्थानी सैन्याने परतवुन लावला
Pakistan Attack Civilians पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका
पाकिस्तान दुहेरी संकटात! बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ल्याला सुरुवात