ICAI Exam 2025 Postponed – हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती, आयसीएआयने CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

ICAI Exam 2025 Postponed – हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती, आयसीएआयने CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीएच्या सर्व परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता आणि सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन 9 मे ते 14 मे 2025 या काळात होणारे सीए फायनल, इंटर मीडिएट आणि पोल्ट क्वालिफिकेशन कोर्सचे (इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट – आयएनटीटी एटी) उर्वरित पेपर पुढे ढकण्यात आले आहेत, आयसीएआयने स्पष्ट केले. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.icai.org ही वेबसाईट वेळोवेळी पहावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील वेळापत्रकानुसार सीएच्या परीक्षांच्या तारखा 2 ते 14 मे दरम्यान नियोजित होत्या. सीए इंटरमिजिएट परीक्षेत ग्रुप-1 चे पेपर 1, 5 आणि 7 मे रोजी होणार होते, तर ग्रुप-2 चे पेपर 9, 11 आणि 14 मे रोजी होणार होते. तसेच सीए अंतिम परीक्षेच्या ग्रुप-1 चे पेपर 2, 4 आणि 6 मे रोजी, तर ग्रुप-2 चे पेपर 8, 10 आणि 13 मे रोजी होणार होते.

इंटरमिजिएट अभ्यासक्रमांच्या परीक्षा दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार होत्या, तर अंतिम अभ्यासक्रमाच्या परीक्षचे पेपर 1 ते 5 साठी दुपारी 2 ते सायंकाळी 5 पर्यंत वेळ देण्यात आली होती, तर पेपर 6 साठी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र आता या परीक्षाच पुढे ढकण्यात आल्या आहेत.

पाकड्यांना भीक मागून युद्ध लढण्याची खुमखुमी; हिंदुस्थानच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा कांगावा करत मित्रराष्ट्रांपुढे कटोरा पसरला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती
शुक्रवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्यानंतर एकाच कुटुंबातील किमान तीन जण गंभीर जखमी झाले. तिघांपैकी एकाची...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाचा दावा
Heaalthy Lifestyle: कलिंगडासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा…..
लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ
Big Breaking India Pakistan War- पुन्हा एकदा पाकिस्तानचा हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला
India Pakistan War- जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरु
Big Breaking India Pakistan War- पंजाब, पठाणकोट अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट