अखेर युद्धाचा भडका उडाला! हिंदुस्थानचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक; राजधानी इस्लामाबाद, लाहोरसह सात शहरांवर क्षेपणास्त्र डागली
‘ऑपरेशन सिंदूर’ने बिथरलेल्या पाकिस्तानने मंगळवार रात्रीपासून हिंदुस्थानातील श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, भूजसह 15 लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. हे सर्व हल्ले लष्कराने हाणून पाडले व जशास तसे उत्तर देत पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह 12 शहरांवर ड्रोन डागून एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. त्यानंतरही कुरापती सुरूच ठेवत पाकिस्तानने बुधवारी रात्री जम्मू विमानतळासह पंजाब आणि राजस्थानात पुन्हा क्षेपणास्त्रांचा मारा केल्याने दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलाने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह सात शहरांवर क्षेपणास्त्रs डागली तर त्याचवेळी नौदलाने आयएनएस विक्रांतला रणमैदानात उतरवत समुद्रमार्गे कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांनी पाकिस्तानची झोप उडाली असून संपूर्ण पाकमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने मंगळवारी मध्यरात्री घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 वर दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामुळे पाकिस्तान बिथरला आणि नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावांना टार्गेट करीत हल्ले सुरू केले. बुधवारी मध्यरात्री 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे मनसुबे हिंदुस्थानी लष्कर आणि हवाई दलाने धुळीस मिळविले. याबाबतची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतरही पाकिस्तानने आगळीक करत नव्याने जम्मूसह सीमावर्ती भागांत ड्रोन व क्षेपणास्त्र्ाs डागल्याने युद्धाला तोंड फुटले. पाकिस्तानवर लष्कराने हवाई हल्ला चढवला.
‘विक्रांत’ रणमैदानात… नौदलाचा कराची बंदरावर अटॅक लागोपाठ 10 धमाके
हिंदुस्थानने रात्री उशिरा कराची बंदरावर सर्वात मोठा हल्ला चढवला. नौदलाने आयएनएस विक्रांतला रणमैदानात उतरवत समुद्रातून कराची बंदरावर स्ट्राईक केला. कराची बंदरात एकामागून एक असे 10 शक्तिशाली स्फोट झाले असून अख्खं बंदर या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तान जन्मापासून खोटं बोलत आहे
‘ऑपरेशन सिंदूर’चे टार्गेट फिक्स आहे. दहशतवादी तळांवर हल्ला करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सैन्य पिंवा नागरिकांना टार्गेट केलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानचा कांगावा खोटा आहे. पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून त्या देशाने कायम खोटं बोलण्याचे काम केले आहे, असेही मिसरी यांनी फटकारले.
हिंदुस्थानकडून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल – कर्नल कुरेशी
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने 7 मे रोजी मध्यरात्री दहशतवादी तळांवर 100 वर दहशतवादी ठार केले. आजही हिंदुस्थानने प्रत्युत्तर दिले आहे. यापुढेही योग्य प्रत्युत्तर देईल, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्टपणे सांगितले.
हवाई हद्दीत विमानांची गर्दी
एअरस्पेस बंदीमुळे विमानांची एकाच भागात गर्दी पाहायला मिळत आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानची हवाई हद्द विमानांच्या गर्दीने जाम झाली आहे.
नागरिकांचे स्थलांतर
राजस्थान सीमेवर मोठय़ा हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. सीमेलगतची अनेक गावे खाली केली जात आहेत. सीमेपासून 20 किमी अंतरावरच्या लोकांचे स्थलांतर केले जात आहे.
चायना माल बोगस
हिंदुस्थानच्या ड्रोन स्ट्राइकने लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम निकामी झाली. ही यंत्रणा पाकिस्तानने चीनकडून घेतली होती. चीनची कोणतीही वस्तू बोगस आणि कुचकामी असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
अमेरिकेचा हस्तक्षेप
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या परराष्ट्रमंत्री माकाx रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव त्वरित कमी करण्याची आणि थेट संवाद साधण्याची गरज रुबियो यांनी अधोरेथखित केली.
लाहोरमध्ये अराजक, पळापळ
पाकिस्तानच्या ड्रोन, क्षेपणास्त्र्ा हल्ल्याला हिंदुस्थानी लष्कर आणि हवाई दलाने तत्काळ चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानने हार्पी ड्रोनचा हल्ला करीत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम प्रणाली नष्ट केली. रावळपिंडी, कराची येथीलही एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हवाई दल किती कमकुवत आहे याचा पुरावाच जगासमोर आला. हिंदुस्थानचे हार्पी ड्रोन हे इस्रायली बनावटीचे आहे. अत्यंत अत्याधुनिक, अचूक भेद घेणारे ड्रोन म्हणून ओळखले जाते.
पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डाच
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डाच आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपला होता. पठाणकोठ हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे पुरावे दिले होते, मात्र पाकिस्तानने प्रत्येकवेळी दहशतवाद्यांना वाचविले असा हल्लाबोल मिसरी यांनी केला. पाकिस्तानने गेल्या सात दशकांत अनेकदा हिंदुस्थानवर युद्ध लादले. यावेळी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला. पण आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा मिसरी यांनी दिला.
हल्ल्याचे पुरावे सापडले
पाकिस्तानच्या हल्ल्यांचे लक्ष्य निष्क्रिय करण्यात आले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांचे हे पुरावे आहेत, असे परराष्ट्र सचिव म्हणाले. तर हल्ला करताना पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले नव्हते, परंतु हिंदुस्थानी लष्करावर कारवाई झाल्यास त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा पुनरुच्चार विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केला. तर पाकिस्तानने हल्ले वाढवले तर त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल. त्यामुळे आता पाकिस्तानने पुढचा निर्णय घ्यायचा आहे, असे मिसरी म्हणाले.
चार राज्यांतील 15 लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानी सैन्याने बुधवारी मध्यरात्री हिंदुस्थानातील उत्तर आणि पश्चिम भागातील शहरांना लक्ष्य केले. चार राज्यांतील 15 लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-कश्मीरातील श्रीनगर, अवंतीपोरा, पंजाबमधील पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदिगड, राजस्थानातील नाल, फलोदी, उत्तरलाई आणि गुजरातच्या भूज येथील लष्करी तळांच्या दिशेने क्षेपणास्त्र्ाs आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानच्या मजबूत एस-400 हवाई संरक्षण प्रणालीने पाकडय़ांचे मनसुबे धुळीस मिळविले. हवेतच पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईल उद्ध्वस्त केले. त्याचे अवशेष आता सापडले असून पाकिस्तानविरुद्ध हा पुरावा आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
8 हजारांहून अधिक एक्स खाती बंद
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी हिंदुस्थानने सोशल मीडियावर मोठी कारवाई केली आहे. हिंदुस्थानातील तब्बल 8 हजारांहून एक्स खाती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इस्रायली हापोर ड्रोनचा मारा
इस्रायली हापोर ड्रोनचा हिंदुस्थानने मारा केला. लाहोर, रावळपिंडी, अटक, चकवाल, शेखपुरा, घतोकी, उमरकोट, एस्तोर, कराची, गुजरावाला, मियानो, धरकाई, बहावलपूरवर, सियालकोटवर हिंदुस्थानने ड्रोन डागले. या हल्ल्यात पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झाली असून रावळपिंडीतील स्टेडियमलाही तडाखा बसला आहे. या स्टेडियमवर आज होणारा पीएसएलचा सामना रद्द करण्यात आला आहे.
एस 400 चा खौफ!
एस 400 ही एअर डिफेन्स सिस्टम सुदर्शन चक्र म्हणून ओळखली जाते. एस 400 सिस्टमच्या सहाय्याने लष्कराने पाकिस्तानचे हल्ले परतवले. यातून एकाचवेळी 72 क्षेपणास्त्रांचा मारा करता येतो.
पाकिस्तानच्या गोळीबारात 16 हिंदुस्थानींचा मृत्यू
पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार सुरूच आहे. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी सेक्टरवर तोफगोळय़ाचा मारा आणि गोळीबार केला जात असून आतापर्यंत एक जवान शहीद, 16 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू तर 59 जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थानी लष्कर या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. तणाव वाढू द्यायचा नसेल तर पाकिस्तानने हे शस्त्र्ासंधीचे उल्लंघन थांबवावे, असे संरक्षण मंत्रालयाने आज पाकिस्तानला ठणकावले.
मंगळवार रात्रः सुदर्शन चक्र अर्थात एस 400 या एअर डिफेन्स सिस्टमने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, भूजसह 15 लष्करी तळांवरील क्षेपणास्त्र हल्ला लष्कराने हाणून पाडला.
बुधवार सकाळः रावळपिंडी, कराची, सियालकोट, अटकसह पाकिस्तानातील 12 शहरांवर हिंदुस्थानी लष्कराने ड्रोन डागले, पाकिस्तानात सर्वत्र युद्धाचा सायरन आणि भीतीने पळापळ.
बुधवार रात्रः जम्मू, पंजाबमधील पठाणकोट आणि राजस्थानातील जैसलमेरवर पुन्हा क्षेपणास्त्रs आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न. एस 400 ने हे हल्ले उधळले. 8 क्षेपणास्त्रs पाडली.
इंडिया गेट रिकामे, ताजमहालची सुरक्षा वाढवली
युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानकडून देखील खबरदारी बाळगली जात आहे. ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे तसेच दिल्लीतील इंडिया गेट रिकामा करण्यास सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानने सैन्यप्रमुख मुनीर यांना हटवले
– पाकिस्तानी सैन्यप्रमुख असीम मुनीर यांना अखेर पदावरून हटवण्यात आले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाल्याच्या आणि हिंदुस्थानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे प्रचंड नुकसान, जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुनीर यांना पदावरून हटवल्याचे वृत्त आहे. शमशाद मिर्जा नवे सैन्यप्रमुख होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुनीर आणि शरीफ यांच्या घराजवळ बॉम्बस्पह्ट
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळ बॉम्बस्पह्ट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यातील मृतांना 6 लाखांची मदत
– पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबाराला बळी पडलेल्या जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ जिह्यातील नागरिकांना जिल्हा रेड क्रॉस निधीतून आर्थिक मदत देण्यात आली, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 20 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
बलुच आर्मीच्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार
– बलोच बंडखोरांनी पाकिस्तानाला धक्का दिला आहे. त्यांनी पाकिस्तानला जखमी केलं आहे. बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याची गाडी आई ई डी स्फोटात उडवून दिली. यात पाकिस्तानचे 14 सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम प्रांतात बलूचिस्तानच्या कच्छी जिह्याच्या माच क्षेत्रात सैन्याच्या एक वाहनावर घात लावून घ्Dिं द्वारे हल्ला करण्यात आला. हा हल्ला मंगळवारी झाला. पण हल्ल्याच फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. स्फोटानंतर गाडीतील सैनिक हवेत अक्षरक्षः उडाले. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.
पाकिस्तानचा वैमानिक हिंदुस्थानच्या ताब्यात
– राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या वैमानिकाला हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी जिवंत पकडले. क्षेपणास्त्रांचा तसेच तोफगोळ्यांच्या आवाजाने राजस्थान सीमेवर पोलिस आणि सुरक्षा दल सतर्क झाले. सीमेवरील अनेक जिह्यांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला. पाकिस्तानची क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्स निष्क्रिय करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानकडून हमास स्टाईल क्षेपणास्त्रांचा वापर
– पाकिस्तान जम्मूत हमास स्टाईल क्षेपणास्त्रांचा वापर करत असल्याचे वृत्त एएनआय या न्यूज एजन्सीने दिले आहे. हमासने इस्रायलवर जसे हल्ले केले होते त्याच पद्धतीने पाकिस्तानकडून हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात पीओकेत आयएसआय आणि हमास यांच्यात बैठक झाल्याचे उघड झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List