भारत-पाकिस्तानच्या लढाईत चीनचा फायदा; फायटर जेट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सुस्साट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने बुधवारी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला आहे. पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांत होत असलेल्या लढाईत चीनला फायदा मिळताना दिसत आहे. चीनमधील संरक्षण कंपनी एविक चेंगदू एअरक्राफ्ट कंपनीचे शेअर्स दोन दिवसांत तब्बल 36 टक्क्यांहून जास्त वाढले आहेत. ही कंपनी चीनच्या शेनझेनमध्ये लिस्टेड असून ती जे-17 आणि जे-10 सी सारखे फायटर जेट बनवते. पाकिस्तानच्या एअरफोर्सकडे जे-10 विगोरस ड्रगन आणि जेएफ-17 थंडर विमान आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी 17 टक्के वाढ झाली. गुरुवारीसुद्धा या कंपनीचे शेअर्स 16.37 टक्के वाढून 80.68 युआनवर पोहोचले. अवघ्या दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स 36.21 टक्क्यांनी वाढले आहेत. हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दावा केला होता की, हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जे-10 सी फायटर विमानाचा वापर केला आहे; परंतु राफेल आणि सुखोईसमोर हे टिकाव धरू शकत नाही.
पाकिस्तानचा दावा
जेएफ-17 फायटरमध्ये एअर टू एअर, एअर टू सरफेस आणि अँटी शिप मिसाईलचा समावेश आहे. तसेच हे विमान गाइडेड आणि अनगाइडेड बॉम्बसुद्धा घेऊन जाऊ शकते, असा पाकिस्तानने दावा केला आहे. परंतु, ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानी विमानांनी पाकिस्तानच्या 100 किलोमीटरमध्ये घुसून जो हल्ला केला त्यामुळे जेएफ-17 चे पितळ उघडे पडले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List