पाकडे आम्हाला घाबरवू शकत नाही, हिंदुस्थानी लष्करावर आमचा पूर्ण विश्वास; जम्मू- कश्मीरच्या स्थानिकांची निडर भूमिका
हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबत पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकड्यांनी सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबाराला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी लष्कराने पाकड्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या संकटकाळात डम्मू कश्मीरमधील स्थानिकांनी निडर भूमिका घेत हिंदुस्थानी लष्कराला पाठिंबा देत त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. हिंदुस्थानी लष्कर आमचे रक्षण करण्यास समर्थ आहे, असेही स्थानिकांनी सांगितले.
जम्मू आणि कश्मीरमध्ये रात्री उशिरा आणि पहाटे झालेल्या स्फोटांमुळे स्थानिकांना फटका बसला. अशा प्रकारे गोशीबार किंवा हल्ले करत पाकडे आम्हाला घाबरवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत आमचे साहस कमी होणार नाही. या हल्ल्याने आम्ही झोपेतून जागे झालो. मात्र, आपले सैन्यदल सतर्क असल्याने आपल्याला कसलाही धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या सतर्क जवानांनी सर्व परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. तसेच जवानांवर पूर्ण विश्वास आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये रात्री उशिरा आणि पहाटे झालेल्या स्फोटांमुळे स्थानिक घाबरलेले नाहीत. त्यांना भारतीय सैन्यावर विश्वास आहे. जे प्रत्येक आघाडीवर शत्रूंना योग्य उत्तर देत आहे. काल रात्री जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात अचानक झालेल्या स्फोटांच्या आवाजाने लोकांची झोप उडाली. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, आम्ही जेवण सुरू करताच बाहेर एक मोठा स्फोट ऐकू आला. सुरुवातीला सगळं काही सामान्य असल्यासारखे वाटत होते, पण काही वेळाने पुन्हा स्फोट झाला. पहाटे 4.30 च्या सुमारास पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले, परंतु आमच्या सैन्याने तातडीने कारवाई केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सामान्य लोकांवर हल्ला करणारे भित्रे असतात. पाकिस्तानच्या सैन्यात आपल्या सैनिकांशी थेट लढण्याची हिंमत नाही. म्हणूनच ते असे भ्याड हल्ले करत आहेत. आम्ही खंबीर आहोत, आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही. आपल्या सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा प्रत्येक कट अयशस्वी होत आहे. स्फोटांनंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List