अमेरिकन दूतावासातील कर्मचारी सुरक्षित स्थळी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लाहोर येथील अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांना आज सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले. हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लाहोर विमानतळाजवळील परिसर रिकामा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले. एकंदरीत युद्धसदृश परिस्थिती पाहता तणावग्रस्त भागातून बाहेर पडा आणि जर तसे शक्य नसेल तर सुरक्षित स्थळी जा, असा आदेश अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱयांना दिला. ऑपरेशन सिंदूरनंतर काही तासांतच अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला. पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने अमेरिकन नागरिकांना हिंदुस्थान- पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील संघर्षग्रस्त क्षेत्रे टाळण्याचे आवाहन केले. दहशतवाद आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवास न करण्याचा सल्ला दिलेला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List