आजपासून बेस्टचा प्रवास महागला, किमान भाडे 10 रुपये

आजपासून बेस्टचा प्रवास महागला, किमान भाडे 10 रुपये

आर्थिक काडीत सापडलेल्या बेस्ट बसच्या तिकिटांच्या दरात दुपटीने वाढ करण्यास परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी रात्री 12 पासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे साध्या बसचे किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये होणार आहे, तर वातानुपूलित बसचे किमान तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार आहे. बसमध्ये एका बस स्टॉपसाठीही शिरलेल्या प्रवाशाला आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या दरवाढीतून बेस्टला वर्षाला तब्बल 590 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून मोठय़ा आर्थिक संकटात सापडली आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र शिवसेनेसह सर्वपक्षीय आणि मुंबईकरांनी केलेल्या विरोधानंतर तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा बेस्टने मुंबई महापालिका आयुक्तांकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या दरवाढीला मान्यता दिली होती. गेल्या शुक्रवारी मंत्रालयात बेस्ट उपक्रम आणि परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दरवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परिवहन प्राधिकरणाने या दरवाढीला मंजुरी दिली आहे.

 बेस्टच्या मासिक पाससाठी 900 रुपयांऐवजी 1800 रुपये मोजावे लागणार आहेत, तर दैनंदिन पाससाठी 60 रुपयांऐवजी 75 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान बेस्टने 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी पुन्हा हाफ तिकीट सुरू केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;