काखेतील काळेपणामुळे स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही; हे घरगुती उपाय काखेतील काळेपणा कायमचा दूर करतील! वाचा सविस्तर

काखेतील काळेपणामुळे स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही; हे घरगुती उपाय काखेतील काळेपणा कायमचा दूर करतील! वाचा सविस्तर

उन्हाळा सुरु झाल्यावर त्वचेच्या अनेक समस्या या डोकं वर काढू लागतात. उन्हाळ्यात जास्त घामामुळे त्वचेवर टॅनिंग वाढू लागते. त्यामुळे मुरुमांची संख्याही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये वाढते. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्यांकडे उन्हाळ्यात अधिक दक्ष राहावे लागते. उन्हाळ्यात सुती कपड्यांना आपण अधिक प्राधान्य देतो. परंतु स्लीव्हलेस ड्रेस मात्र काखेतील काळेपणामुळे घालता येत नाहीत. अशावेळी काही घरगुती उपायांनी आपल्या काखेतील काळेपणावर मात करु शकतो. अगदी सोपे आणि खिसाही जपणारे हे उपाय आहेत.

काखेतील काळेपणावर घरगुती उपाय
तुमच्या काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी, बटाटा हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपण बटाट्याचा रस काढून काखेत लावू शकतो. फक्त योग्य पद्धत वापरून आपण हा उपाय करायला हवा.

 

यासाठी काय करावं लागेल
यासाठी तुम्हाला एक बटाटा घ्यावा लागेल. बटाटा किसून घ्या, त्यानंतर त्याचा रस पिळून काढा. त्यात थोडेसे अ‍ॅलोवेरा जेल घालावे. हा रस काखेत लावावा, किमान 15 मिनिटे हा रस चोळून लावून तसाच ठेवावा. त्यानंतर काख स्वच्छ धुवून घ्यावी.

 

 

नारळ तेल आणि लिंबू
काखेतीरल काळेपणा घालवण्यासाठी नारळ तेल आणि लिंबू हा देखील उत्तम पर्याय मानला जातो. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल जास्त असते त्यामुळे त्वचेला उजळपणा येण्यास मदत होते. तसेच नारळ तेलही त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.

एका भांड्यात 2 चमचे खोबरेल तेल घ्यावे लागेल. त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळावा, नंतर ते कापसाच्या मदतीने लावावे. काही वेळ हे सुकू द्यावे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करावे. या उपायाने काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.

काखेत कधीही ब्लीच लावू नका, ब्लीचमुळे त्वचा जळण्याचा जास्त संभव असतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;