‘ती माझ्या आई आणि बहिणीला शिवीगाळ…’ पहिली पत्नी अमृताबद्दल सैफ अली खानने सांगितले कटू सत्य
90 च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न.ही जोडी तेव्हाही चर्चेत होती आणि आजही त्यांच्या नात्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चा होत असतात. दोघांनीही वय आणि धर्म काहीही असो, 1991 मध्ये लग्न केल. परंतु हे नाते फार काळ टिकू शकले नाही. सैफची आई शर्मिला टागोर या निर्णयावर खूप नाराज होत्या. तथापि, प्रेम असूनही, त्यांचे नाते हळूहळू बिघडत गेले. सैफने त्याच्या एका मुलाखतीत अमृतासोबतच्या घटस्फोटाबद्दलही सांगितलं होतं. सैफने सांगितले होते की प्रत्येक वेळी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा कशापद्धतीने अपमान होत होता.
“मी माझ्या आई आणि बहिणींना टोमणे आणि शिवीगाळ सहन करताना पाहिलं”
अमृताचे रागीट वर्तन आणि सैफचे फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेला स्ट्रगल यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता असं म्हटलं जातं. त्यावेळी अमृता इंडस्ट्रीतील एक मोठी स्टार होती आणि सैफ त्याच्या करिअरसाठी स्ट्रगल करत होता. पण, जेव्हा नातं तुटलं तेव्हा सैफने काही कटू सत्यंही सांगितले. ‘द टेलिग्राफला’ दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितले होते की अमृता त्याच्या कुटुंबाला, विशेषतः त्याच्या आई आणि बहिणींना रागात टोमणे मारायची, वाईट शब्द बोलायची. याबद्दल सांगताना सैफ म्हणाला की, “मी माझ्या आई आणि बहिणींना टोमणे आणि शिवीगाळ सहन करताना पाहिलं आहे. मला अमृतासोबत वाद नको होता, ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होती आणि नेहमीच राहील. मला ती आणि माझी मुले आनंदी हवी आहेत”
घटस्फोटानंतर सैफला त्याच्या मुलांना भेटण्याची परवानगी नव्हती
याशिवाय, घटस्फोटानंतर आपल्या मुलांना भेटण्यात येणाऱ्या अडचणींबद्दलही सैफने सांगितले होते. तो म्हणाला, “मला माझी मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम यांची खूप आठवण यायची. पण मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. घटस्फोटानंतर मला कधीही त्यांच्याकडे जाण्याची परवानगी नव्हती.” घटस्फोटानंतर अमृताला पोटगी देण्याबद्दलही सैफने सांगितले. त्याने सांगितले की त्याचा घटस्फोट हा इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक होता.
घटस्फोटानंतर त्याला पोटगी देण्यासाठी कराव्या लागलेल्या स्ट्रगलबद्दलही सांगितले
सैफ म्हणाला की, “मी अमृताला 5 कोटी रुपये दिले, आणि मी तिला आधीच 2.5 कोटी रुपये दिले होते. याशिवाय, माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत मी दरमहा 1 लाख रुपये दिले. मी शाहरुख खान नाही. माझ्याकडे इतके पैसे तेव्हा नव्हते . जाहिराती, स्टेज शो आणि चित्रपटांमधून मी जे काही कमावलं होतं ते मी माझ्या मुलांसाठी कमावले होते. तेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. आमचा बंगला अमृता आणि मुलांसाठी आहे.” सैफने त्याच्या लग्नाबद्दल,किंवा त्याच्या आणि अमृताच्या नात्याबद्दल, घटस्फोटाबद्दल नेहमीच चांगल्या-वाईट अनेक गोष्टी सांगितल्या पण अमृता सिंगकडून अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List